न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल २०२२) :- महापालिकेच्या क्रीडा विभागाने पिंपरी येथील वाघेरे जलतरण तलाव बुधवार (दि. १३) पूर्ण क्षमतेने नियोजित वेळेनुसार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच निगडी – प्राधिकरण येथील जलतरण तलावही सुरू करण्यात आला आहे.
जलतरण तलाव सुरू करण्याचे आदेश क्रीडा विभागाला दिले होते. मात्र बंद असलेल्या जलतरण तलावांमध्ये स्टाईल, रंगरंगोटी, अवस्था दयनिय झाली होती. त्यामुळे शुध्दतेची तपासणी, आसन व्यवस्था बसविण्याचे काम आदी कामे एकाच वेळी करण्यात आली. क्रीडा विभागाच्या वतीने जलतरण तलाव सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कासारवाडी, नेहरूनगर, संभाजीनगर, केशवनगर जलतरण तलाव सुरू होणार आहेत.
शहरातील सर्वच जलतरण तलाव सुरू करण्यात येणार आहेत. काही दिवसातच चार जलतरण तलाव खुले केले जाणार आहेत. यासाठी किमान २०० टँकर पाण्याची आवश्यकता भासणार आहे. पाण्याची सोय झाल्यानंतर तलाव सुरू केले जातील.
-सुषमा शिंदे, सहायक आयुक्त, महापालिका…