न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ एप्रिल २०२२) :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लीम समाजाच्या वतीने १० हजार बंद बाटलीतील बिसलरी थंड पाण्याचे मोफत वाटप आज पिंपरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात पिंपरी चिंचवड जुलूस कमिटीचे माजी अध्यक्ष ख्वॉजाहुसेन कुरेशी यांच्या नेतृत्व व पुढाकारातून करण्यात आले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी येतात. एप्रिल महिन्यात कडक उन्हाळा असतो. लहान मुले, मुली, महिला, जेष्ठ नागरीक यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध व्हावी, समाजात सलोखा निर्माण व्हावा यासाठी मुस्लीम समाज गेली अनेक वर्ष उपक्रम राबवित आहे. आज सकाळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार आण्णा बनसोडे यांच्या हस्ते मोफत पाणी वाटपाचे उद्धाटन करण्यात आले. त्यांचा सत्कार यावेळी कुरेशी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून करण्यात आला. दिवसभरात माजी आमदार डॉ. गौतम चाबूकस्वार, ओबीसी सेलच्या अध्यक्षा सारीका पवार, गरीबी निर्मूलन समितीचे अध्यक्ष लालासाहेब गायकवाड, बाळासाहेब खंदारे, महेंद्र पवार आदीनी भेट दिली.
बंदोबस्तासाठी असलेले वाहतूक, शहर पोलीस यांना पाणी वाटप करण्यात आले. त्यासाठी कुरेशी, सतीश धोडेराव, चंद्रकांत कांबळे, विदीशा धोडेराव, प्रा तात्या पारडे, मौलाना अब्दूल गफ्फार, निवृत्त पोलीस अधिकारी गुलाम हुसेन, हाफीज अब्दूल् हमीद कुरेशी, चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलाम अली भालदार, सुभाष आहेर, शिक्षक सलीम इनामदार आदीनी विशेष परीश्रम घेतले.