- भोसरीतील घटना; एकजण ताब्यात; आईचा आक्रोश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२२) :- भोसरी एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणाचं दोन दिवसांपूर्वी रात्री ९.३० च्या दरम्यान मित्रांनी राहत्या घरातून अपहरण केलं. त्याची आई घरीच होती. सर्व मुलं ओळखीची असल्याने त्यांनी काही विचारलं नाही. ते सर्व एकत्र घराबाहेर पडले, परंतु, मुलगा परत आला नाही म्हणून त्यांनी सर्वत्र विचारपूस केली.
तेव्हा त्याला काही जणांनी मारहाण केली असल्याचं सांगण्यात आलं. तरुणाच्या आईने पोलीस ठाणे गाठले. ज्यांनी मारहाण केली त्यांची नाव पोलिसांना सांगण्यात आली. यानंतर एका २३ वर्षीय आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता जुने भांडण आणि प्रेमप्रकरणातून त्याचा खून केल्याचं उघड झाल.
एक अल्पवयीन मुलगी तरूणासोबत सोबत बोलायची, त्याच मुलीवर अल्पवयीन चौघांचं प्रेम होतं असं सांगण्यात येत आहे. याच रागातून तरुणाचे अपहरण करून त्याला चाकण परिसरातील शेलपिंपळगाव परिसरात नेले. तिथं त्याचा दगडाने ठेचून खून केला. कृष्णा रेळेकर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी आठ पैकी २३ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतलं असून सात अल्पवयीन मुलं फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी एमआयडीसी पोलीस घेत आहेत.