न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि ८ फेब्रु.) :- मोरवाडीतील सम्राट चौकाचे सुशोभिकरण करुन, तेथे भगवान गौतम बुध्द यांचे हस्तशिल्प उभारण्यात यावे, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे शहरप्रमुख गणेश जाधव यांनी केली आहे. त्यासंर्दभात त्यांनी नगरसेवक तुषार हिंगे, नगरसेविका अनुराधा गोरखे व प्रभाग अधिकारी आशाताई दुरगुडे यांना निवेदन दिले आहे.
यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे विद्यासागर गायकवाड, रुपेश कदम, देवेन यादव, रविराज मांडवे, कैलाश कुदळे, सुनिल निकम, प्रमोद देवरे, मनोहर मोरे आदी उपस्थित होते.











