- महापालिकेतील स्मार्ट सिटीच्या अपूर्ण कामांना वेग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२२) :- एक एप्रिलपासून कोणतीही नवीन निविदा प्रक्रिया राबवू नये, असा स्पष्ट आदेश केंद्र सरकारने सर्व ‘ स्मार्ट सिटी ‘ कंपन्यांना दिला आहे. त्यामुळे पुढील वर्षी जून महिन्यात ‘ स्मार्ट सिटी ‘ कंपनीचे कामकाज थांबणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यानंतर हा कारभार महापालिकेच्या ताब्यात येणार आहे.
पिंपरी – चिंचवड शहर स्मार्ट सिटीसाठी केंद्र सरकारकडून ३९२, राज्य सरकारकडून १९६ तर महापालिका १९६ असा ७८४ कोटींचा निधी मिळाला होता. यामधील ७५१ कोटींचा निधी खर्च झाला आहे. ३३ कोटींचा निधी शिल्लक आहे. शेवटचा १९६ कोटी रुपयांचा हप्ता स्मार्ट सिटीसाठी मिळणार आहे. केंद्र सरकारने स्पर्धेअंती शंभर शहरांची ‘ स्मार्ट सिटी ‘ मिशनमध्ये निवड केली होती सुरुवातीला पिंपरी – चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला नव्हता. त्यावरून आरोप प्रत्यारोप झाले. दोन वर्षांनी स्मार्ट सिटीतून नवी मुंबई महापालिका बाहेर पडल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला. त्यानंतर शहरात १३ जुलै २०१७ रोजी पिंपरी – चिंचवड ‘ स्मार्ट सिटी ‘ कंपनीची स्थापना करण्यात आली. त्यानुसार केंद्र, राज्य सरकार आणि महापालिका यांच्या आर्थिक मदतीतून या कंपनीकडून शहरातील विविध भागात विकासकामे करण्यात आली आहेत. कंपनीची मुदत २०२२ मध्ये पूर्ण होणार होती. या कंपनीकडून सुरू करण्यात आलेले अनेक प्रकल्प अपूर्ण असल्याने या कंपनीला वर्षाची मुदतवाढ दिली आहे. ही मुदत जून २०२३ मध्ये पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय नगरविकास मंत्रालयातर्फे देशातील सर्व ‘ स्मार्ट सिटी कंपन्यांना नुकतेच एक पत्र पाठविण्यात आले असून त्यामध्ये ३१ मार्च २०२२ नंतर कुठलीही निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. स्मार्ट सिटी कंपनीकडून सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांची कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य त्यांना देण्यात आले आहेत. स्मार्ट सिटी कंपनीचा कारभार पूर्ण होताना सुरू असलेले प्रकल्प महापालिकेला हस्तांतरित करण्यात येणार आहेत. पिंपरी – चिंचवड शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गत असलेली काही कामे पूर्ण तर काही कामे अपूर्ण आहेत.
स्मार्ट ट्राफिक मॅनेजमेन्ट सिटी सव्र्हेंलन्स, स्मार्ट पार्किंग इन्क्लुडींग मल्टीलेव्हल कार पार्क, कमांड कंट्रोल सेंटर, ऑप्टिकल फायबर केबल, स्मार्ट वॉटर सप्लाय, पल्बिक वायफाय हॉटस्पॉट, स्मार्ट सेव्हरेज आयसीटी इनॅबल एसडल्युएम, स्ट्रीटस्केप इन्क्लुडींग अंडरग्राऊंड युटीलिटी, ट्यू पार्क अॅण्ड स्मार्ट टॉयलेट इन एबीडी, जीआयएस इनॅबल इआरपी इन्क्लुडींग म्युनिसीपल सर्व्हिस लेव्हल बेंच मेकिंग युनिक स्मार्ट अँड्रोसिंग अॅण्ड ऑनलाइन इस्टॅब्लिशमेंट लायसिस.
पूर्ण झालेली कामे सौरऊर्जा प्रकल्प, स्मार्ट किओक्स, बायसिकल शेअरिंग, स्कील डेव्हलपमेंट सेंटर, स्टार्ट अप इन्क्युबेशन सेंटर, ई क्लास रूम, स्कूल हेल्थ मॉनिटरंग, पब्लिक ई- टॉयलेट, सिटी मोबाईल अॅप अॅण्ड सोशल मीडिया.
















