- हिंदूंच्या जयंत्या, सण, यात्रा येथील भोंग्यांवरदेखील बंदी येणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मे २०२२) :- “भोंगे हे केवळ मशिदीवरील काढले जातील का? नाही. भोंगे हे केवळ मशिदींवर असतातच असे नाही. सगळे भोंगे काढले जातील. हिंदूंचे प्रत्येक गावात सण, यात्रा, जयंती असतात. त्यावेळी डीजे असतात. त्यावर देखील बंदी येईल. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते. ती जयंती पाच दिवस अनेक ठिकाणी चालते. त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणावर स्पिकर लावले जातात. त्यामुळे यावर देखील बंदी येईल. यावर काय करायचं?,” असा प्रश्न आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यास उद्या म्हणजेच तीन मेची मुदत दिली आहे. भोंगे काढले नाही तर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यावर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. भोंग्याचं प्रकरण महाराष्ट्राला काही नवीन नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते सुरू आहे. पण दुर्देवाने म्हणावं लागेल की, त्यांना देखील त्यात यश आले नाही.
“काल राज ठाकरेंनी एका चॅनलला सपत्नीक मुलाखत दिली. त्या मुलाखती ते असे म्हणतात की, काकड आरती, हिंदूंचे होणारे सण हे नमाज आणि मुस्लिमाच्या सणाला प्रतिक्रिया आहे. पण मला असं वाटत की इस्लाम धर्म स्थापन होण्याच्या हजारो वर्ष अगोदरपासून आहे. त्यामुळेच काकड आरतीबाबत राज ठाकरे यांनी असं बोलणं चुकीचे आहे,” असं दवे यांनी म्हटलंय.


















