- चिंचवडमधील घटना; चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ मे २०२२) :- भांडण सोडवले त्याचा राग आरोपीच्या मनात होता. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी जेवण करून गुरुदत्त वॉशिंग सेंटर येथे बसले असताना आरोपी त्याच्या तीन साथीदारांना घेऊन आला.
चौघांनी मिळून फिर्यादी यांना कोयत्याने, दगडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. हा प्रकार शुक्रवारी (दि. २९) रात्री दहा वाजता घडला. सौरभ गोपाळ नढे (वय २४, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजिंक्य बाजीराव वाल्हेकर, दुर्गेश सुर्वे, महादेव तुपे, निखील वायदंडे (सर्व रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.