न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२२) :- जिल्हयात फेरफार अदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला. एका दिवसात ४ हजार ५५२ नोंदी फेरफार अदालतीमध्ये निर्गत करण्यात आल्या असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली. यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये १४८ फेरफार नोंदी निर्गत आल्या आहेत.
राज्य शासन महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. ई – फेरफार प्रणालीमध्ये एक महिन्याच्या वरील प्रलंबित नोंदी निर्गत करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालती घेण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश
देशमुख यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार बुधवार ११ मे रोजी आयोजित फेरफार अदालतीस चांगला प्रतिसाद मिळाला.