न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२२) :- पिंपळे निलखमधील विशाल नगर, प्रभाग क्र. २६ येथील निळ्या पुररेषेतील अनधिकृत व्यवसायिक पत्राशेडवर महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आणि ‘ड’ क्षेत्रिय कार्यालय यांनी बुधवारी (दि. १८) रोजी संयुक्तिक कारवाई केली. या कारवाईमध्ये ३८ पत्राशेड, एकुण अंदाजे ३२,००० चौ.फुट., अनाधिकृत बांधकामे निष्कासित केली.
ड प्रभाग, संजय तुपसाखरे उप अभियंता, राजेंद्र डुंबरे उप अभियंता, वंदना मोरे कनिष्ठ अभियंता, सचिन कुतवळ कनिष्ठ अभियंता, लवटे कनिष्ठ अभियंता, ड प्रभाग येथील धडक कारवाई पथकातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक-१२ व मनपा कर्मचारी व अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच ०६ मनपा पोलिस कर्मचारी व सांगवी पोलिस स्टेशन ०५ पोलीस उपनिरीक्षक -१ , पोलिस कॉन्स्टेबल कर्मचारी- २१, पोलिस मुख्यालयातील १ आर.सी.पी., प्लोटुन (१५ पोलिस कर्मचारी) महाराष्ट्र पोलिस सुरक्षाबल ५४ कर्मचारी, ३ जेसीबी, तसेच २० मजुर यांच्या सहाय्याने करण्यात आली.
















