न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२२) :- मातंग समाजावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज चिंचवड स्टेशन येथे लहुजी पुतळ्यासमोर लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.
दोन दिवसांपासून हे कार्यकर्ते लहुजी पुतळ्याजवळ उपोषणाला बसले होते. आंदोलनाला लहुजी शक्ती सेनाचे तात्या सोनवणे, विष्णू कसबे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, कमल घोलप, बापू घोलप, दीपक चखाले, नेताजी शिंदे आदी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांना पकडून पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे.
















