न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२२) :- रहाटणीतील जगताप डेअरी येथील सिल्वरकी ओयो लॉज येथे आरोपी महिला एका पीडित महिलेकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास क्षितिज लेन येथील लॉजवर छापा टाकून पीडित महिलेची सुटका केली. तसेच दलाल महिलेला अटक केली.
वाकड पोलीस ठाण्यातील ३४ वर्षीय कर्मचारी महिलेने मंगळवारी (दि.१७) फिर्याद दिली आहे. त्यानुसार २४ वर्षीय दलाल महिलेला अटक करण्यात आली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
















