- क्षेत्रीय कार्यालय स्तरावरसुद्धा प्रभागरचनेचे नकाशे उपलब्ध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे २०२२) :- राज्य निवडणूक आयोगाने पिंपरी चिंचवड महापालिकेची अंतिम अधिसूचना शुक्रवारी जाहीर केली; पण प्रभागनिहाय नकाशे जाहीर केले नव्हते. मात्र, आता अंतिम प्रभागरचनेचे प्रभागनिहाय नकाशे महापालिकेच्या निवडणूक विभागाने संकेतस्थळावर बुधवार (दि. १८) रोजी प्रसिद्ध केले आहेत.
त्याचबरोबर महापालिका आणि क्षेत्रीय कार्यालय स्तरावरसुद्धा प्रभागरचनेचे नकाशे पाहायला मिळणार आहेत, अशी माहिती निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोग लगेच कामाला लागला. १७ मेपर्यंत अंतिम प्रभागरचना जाहीर करणार होते. पण त्याअगोदरच पिंपरी – चिंचवड महापालिकेची १३ मे रोजी प्रभागरचना जाहीर झाली. महापालिका आता प्रशासनाकडून प्रभागनिहाय सर्व नकाशे महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
















