न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे २०२२) :- स्टोअर रूममध्ये आरोपींना दारू पिण्यास विरोध केला. याचा राग आरोपींच्या मनात होता. सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांची पत्नी दोघेजण दुचाकीवरून जात होते. ते थॉमस कॉलनी, देहूरोड येथे आले असता समोरून दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर कोयत्याने वार केला.
फिर्यादी यांनी तो वार चुकवला. मात्र ते दुचाकीवरून खाली पडले व गंभीर जखमी झाले. अब्बास इस्माईल शेख (वय ४०, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी बुधवारी (दि. १८) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कादिर कलीम खान आणि त्याचा साथीदार राज (पूर्ण, नाव माहित नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
















