न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. ११ फेब्रु.) :- रिक्षा चालक समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. स्वयं रोजगार करणारा हा घटक आहे. रिक्षा चालकांना निश्चित उत्पन्न मिळाले पाहिजे. यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे मत भाजपा माथाडी आणि जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष अनुप मोरे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत संलग्न सुराज्य रिक्षा स्टँडचे उदघाटन नगरसेवक शेखर चिंचवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, नगरसेवक राजेंद्र गावडे, माऊली सूर्यवंशी, राजाभाऊ चिंचवडे, अमर गावडे, पंचायत पिं. चिं. शहर अध्यक्ष सोमनाथ कलाटे, विभाग अध्यक्ष अजित बराटे, कासम बागवाले आदी उपस्थित होते.
यावेळी बाबा कांबळे म्हणाले, पिं. चिं. शहरात सात हजार नवीन रिक्षा आल्या आहेत, यामुळे रिक्षा व्यवसायात स्पर्धा वाढत असून, रिक्षा चालकांचे आर्थिक प्रश्न बिकट होत आहेत. त्यांना निश्चित उत्पन्न मिळावेत यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी रिक्षा स्टँड अध्यक्ष प्रवीण बोबडे, नितीन पाटोळे, सिद्धू जानकर, संतोष चिघळीकर, महेश पिल्ले, अखिलेश येवले, बालाजी घरत, नितीन चौधरी, अनिल वायकुळे, संदीप कांबळे, नागेश सदावर्ते यांनी परिश्रम घेतले, असे विभाग अध्यक्ष कासम बागवाले यांनी सांगितले आहे.











