- आयआयटीच्या प्रवेशासाठी केली आर्थिक मदत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जून २०२२) :- यशवंत चव्हाण मुक्त विद्यापिठातून पदवीचे शिक्षण पूर्ण करून पहिल्याच प्रयत्नात हिंगोली जिल्ह्यातील आदिवासी भागातील क्षितिजा बोथीकर या मुलीने आयआयटी (IIT) सारख्या संस्थेत प्रवेश मिळवला आहे. संपूर्ण भारतातून फक्त १२ विद्यार्थी या आयआयटी (IIT) प्रवेश परीक्षेतमध्ये उत्तीर्ण झाले आहेत, त्यापैकी क्षितिजा बोथीकर एक आहे.
आयआयटी (IIT) सारख्या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी क्षितिजाला आर्थिक मदतीची गरज होती. राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे शहराध्यक्ष इमरान शेख व कार्याध्यक्ष प्रसन्न डांगे यांच्या माध्यमातून व स्वर्गीय प्रणव गावडे सामाजिक संस्थेच्या वतीने ऐंशी हजार (८०,०००) रुपयांची शैक्षणीक मदत मिळवून दिली.
राजकीय क्षेत्रातून ही मदत करणं शक्य नसल्याने सामाजिक क्षेत्रांतून ही मदत करणं अधिक सोयीस्कर होतं. आरोग्य क्षेत्रांतील विविध उपक्रम घेणारी चिंचवडगावातील स्वर्गीय प्रणव गावडे सामाजिक संस्था या वर्षी या आदिवासी मुलीचा शिक्षणाचा खर्च उचलणार आहे.
शहरातील महत्त्वाच्या गणेश मंडळ, जुलूस कमिटी, जयंती उत्सव कमिटी सारख्या अनेक संस्था पिंपरी चिंचवड भागांत आहेत. त्या माध्यमातून महाराष्ट्रातील गरजवंत मुलांना शैक्षणिक दत्तक घेतले गेले तर, अश्या अनेक दुर्लक्षित घटकातून आलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा लाभ घेण्यास मदत मिळेल व मदतीची ही मोहीम सुरू होईल, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रानभाई शेख यांनी केले.