न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध प्रभागातील प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवार दि. ३ जून रोजी संपन्न होत आहे. त्यासाठी अजित पवार आज शहरात आले आहेत.
महापालिका आवारात अजित पवारांच्या हस्ते पोलिसांना गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस पेट्रोलिंगसाठी ५० स्मार्ट मोटार सायकल्स हस्तांतरीत करण्यात आल्या. अग्निशमन विभागाला गल्लीबोळांच्या ठिकाणी तातडीने सहजपणे पोहोचून अधिक प्रभावी अग्निशमन सेवा देण्यासाठी फायटर मोटार सायकल्सचे वाटपही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महापालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.














