न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२२) :- एमआयडीसी भोसतील पीएचबीबी वॉल्स या कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या सुरक्षारक्षकाने कंपनीतून एक लाख ५७ हजार रुपयांचे वॉल्स चोरून नेले.
याप्रकरणी राहुल अगरवाल (रा. पिंपरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. योगेश खंडेराव साळुंके (वय २६, रा. बोऱ्हाडेवस्ती, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.


















