न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १३ फेब्रु.) :- चिंचवड येथील केशवनगरमध्ये काकडे टाऊनशीप या आय व जे सोसायटीमध्ये पहिल्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उदघाटन महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे जेष्ठ संपादक अविनाश चिलेकर तसेच महावितरण अभियंता शीतल मेश्राम, कॉरबेट सोलरचे मुख्य भूषण पाटील, भाजपा पुणे जिल्हा रोजगार आघाडी अध्यक्ष सौरभ शिंदे, कैलास राणे, काकडे, युवा अध्यक्ष गणेश बच्चे, अभिजित पवार, सौरभ करणावट, सिद्धू लोणी तसेच सोसायटीचे सभासद व प्रभागातील नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते.
सौरऊर्जा प्रकल्पाचे कॉरबेट सोलरचे मुख्य भूषण पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, हा प्रकल्प ५ kw चा असून यास ४०० स्केअर फिट जागा लागते. दरमहा ६०० पेक्षा जास्त युनिटची बचत होणार आहे. सुमारे ३ लाख रुपये खर्च आला असून, यास ७०,५०० रु. शासकीय अनुदान मिळाले आहे. तसेच २५ वर्ष वारंटी देण्यात आली आहे.
या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात विजेची बचत होणार आहे व त्यामूळे नागरिकांना आर्थिक फायदाही मिळणार आहे. महावितरणाकडून या कामी योग्य सहकार्य मिळाले आहे. अशा लोकोपोयोगी प्रकल्पास माझ्याकडून नेहमीच शक्य तेवढे सहकार्य मिळेल व हा प्रकल्प जनजागृती करून, महत्व सांगून जास्तीत जास्त सोसायटीमध्ये राबवण्यास पुढाकार राहील, असे आश्वासन महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
सुभाष पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर संजय कारदरे यांनी आभार मानले.











