न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रु.) :- रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ विमल गार्डन मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला.
याप्रसंगी राष्ट्रपती पुरस्कार विजेते गणपतराव माडगुळकर (साहाय्यक पोलीस आयुक्त), निर्मलाताई कुटे (नगरसेविका), विठाबाई चाबुकस्वार यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, मा. नगरसेवक साहेबराव खरात, भगवान गोडांबे, संदीप चाबुकस्वार, अर्चना भालेराव, राकेश भास्कर , मुख्याध्यापिका श्राबनी पत्रानाबिश, मंजुला मुदलीयार तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, पालक उपस्थित होते. प्रमुख पाहुणे गणपतराव माडगुळकर (साहाय्यक पोलीस आयुक्त) यांचा संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार ह्यांच्या हस्ते भारतीय संविधान व सन्मानचिह्न देऊन सत्कार करण्यात आला.
गणेश वंदनेने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी महाराष्ट्राची लावणी, सांस्कृतिक नृत्य, गोंधळ नृत्य, प्लास्टिक बंदीवर जागरुकपर आधारित नृत्य, देशभक्तीपर नृत्याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. सूत्रसंचालन प्रियांका लाडे व हर्षदा काकडे, चारुशीला फुलपगारे व शिवांगी नेस्ताने यांनी केले व आभार प्रदर्शन हेमा शेलार यांनी केले.











