न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रु.) :- उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथे समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी असभ्य वर्तन करणारे व त्यांच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करणाऱ्यांचा समाजवादी पक्ष पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत शहर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष रफिक कुरेशी यांनी प्राधिकरण येथे अप्पर तहसीलदार यांना नुकतेच निषेधाचे पत्र दिले आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, लखनऊ उत्तर प्रदेशातीमधील समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी विमानतळावर असभ्य वर्तन करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांवर अमानुषपणे लाठीमार करून, गंभीर जखमी करण्यात आले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी प्रशासन हे कुचकामी ठरले असून, या प्रशासनाचा समाजवादी पक्ष पिंपरी-चिंचवड शहर जाहीर निषेध व्यक्त करीत आहे, असे यात नमूद केले आहे.
अप्पर तहसीलदार यांना निवेदन देताना, रफिक कुरेशी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष, उपाध्यक्ष सालार शेख, प्राध्यापक नरेंद्र पवार, पिंपरी-चिंचवड महिला शहराध्यक्षा वहिदा शेख, संघटक साजेद शेख, विकास वाघमारे, बि. डी. यादव, रवी यादव आदी उपस्थित होते











