न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रु.) :- हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एच. ए.) कंपनीमध्ये ३५-४० वर्षे सेवा करून, निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काची ग्रॅच्युईटी (अंशदान) व इतर देण्यांसाठी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करावे लागले.
समाजातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळण्याऐवजी हक्काच्या पैशांसाठी संघर्षाची भूमिका घ्यावी लागावी, हे अत्यंत गंभीर आहे. एच. ए. कामगार संघटना या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असल्याचे, एचए मजदूर संघाचे उपाध्यक्ष अरुण बोऱ्हाडे यांनी सांगितले आहे.











