- निकाल पाहण्यासाठी भेट द्या…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०२२) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच काल (मंगळवारी) स्वतः शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करुन माहिती दिली की, आज बारावी बोर्डाचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज म्हणजेच, ८ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. आज दुपारी एक वाजल्यानंतर हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. यावर्षी १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. पण, यावेळी बारावीची परीक्षाच १५ दिवस उशिरानं झाल्यामुळे निकालही आठवडाभर उशिरा लागणार आहे.
कुठे पाहाल निकाल?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल आज म्हणजेच, बुधवारी रोजी जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.
https://www.mahahsscboard.in/ आणि www.hscresult.mkcl.org या दोन वेबसाईटवर विद्यार्थी निकाल पाहू शकतात.