न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मंगळवारी (दि. ७) रोजी कारवाई केली.
कारवाईत ‘ ड ‘ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत वाकड परिसरातील प्रभाग क्र. २६ वाकड स्मशान भूमी ते सुखवानी पेट्रोल पंप येथे व मुंबई बेगलोर हायवे वाकड व ताथवडे येथे पालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाने या कारवाईमध्ये वाकड स्मशानभूमी ते सुखवानी पेट्रोल पंप येथे ५२ पत्राशेड व मुंबई बैंगलोर हायवे वाकड व ताथवडे येथे ५४ पत्राशेड निष्कासित करण्यात आले. या बांधकामाचे अंदाचे क्षेत्रफळ १,८८,००० चौ.फु. आहे.
” ई ” क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्र.क्र. ०३, च-होली फाटा ते दाभाडे सरकार चौक येथिल नियोजित ४५ मी. रुंद रस्त्याची उत्तरेकडील बाजू येथे कारवाईमध्ये एकूण ५८ (पत्राशेड / वीट बांधकामे / आर.सी.सी.) अंदाजे क्षेत्रफळ (४८,५१४ चौ. फुट) अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्तया आली.
” ब ” क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत बी.आर.टी. रोड रावेत येथील अनधिकृत व्यवसायिक पत्राशेडवर महापालिकेचे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व ब क्षेत्रिय कार्यालय यांनी संयुक्तिक अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. कारवाईमध्ये ४४ पत्राशेड ४ विट बांधकाम व पत्रा असे एकुण अंदाजे १२२६३.०० चौ.मी. (१,३९,९५०.०० चौ.फुट) अनाधिकृत बांधकामे निष्कासित केली.