न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रु.) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन २०१९-२० या आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सोमवार (दि. १८) रोजी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे स्थायी समितीसमोर सादर करणार आहेत. रोख प्रवाह (कॅश फ्लो) संकल्पनेवर भर देत हा अर्थसंकल्प तयार करण्यात आलेला आहे.
महापालिकेने संबंधित कामांवर, प्रकल्पांवर किती खर्च केला, त्याची फलनिष्पत्ती काय? देयकांच्या बदल्यात कामे किती झाली? हे समजणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचा हा ३७ वा तर महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा हा २ रा अर्थसंकल्प असणार आहे.











