न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जून २०२२) :- वर्ल्ड एअरगन फेडरेशन व एअरगन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने राष्ट्रीय रायफल चॅम्पियनशिपचे आयोजन गोव्यातील युथ होस्टेल येथे (दि. २८ मे ते १ जून दरम्यान) करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या संघात पिंपरी चिंचवड, पुणे येथील तीन स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेत चेतन पवार (२० मिटर- रौप्य पदक), सुरेश कांबळे (२० मिटर-रौप्य पदक), सुशीला कांबळे (२० मिटर – रौप्य पदक) या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.
या सर्व विजयी खेळाडूंचे तसेच एअरगन असोसिएशन ऑफ पिंपरी चिंचवड (पुणे) चे सचिव विजय टेपुगडे यांचा सत्कार नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटचे अध्यक्ष अमित गोरखे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन महेश नलावडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रीतम क्षीरसागर यांनी केले.