न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जून २०२२) :- विक्रीच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड शहरात तब्बल २४ किलो १०५ ग्रॅम वजनाचा ३ लाख ३६ हजार रूपयांचा गांजा आरोपींनी आणला.
पोलिसांनी कारवाईत आरोपींकडून २४ किलो १०५ ग्रॅम वजनाचा ३ लाख ३६ हजार रूपयांचा गांजा, तीन मोबाईल, एक पाढऱ्या रंगाची मोटार कार असा ६ लाख ६६ हजार रूपयांचा माल जप्त केला आहे. ही कारवाई वाकड येथील सम्राट चौक येथे बुधवारी (दि. ८) करण्यात आली आहे.
पोलीस वंदु दत्तात्रय गिरे यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. श्रीकांत लिंबाजी राठोड, (वय ३३ रा. बालेवाडी, मूळ मुळेगाव सोलापूर), सुनिल लालसिंग राठोड (वय ३१, रा. मुळेगाव, सोलापूर) तानाजी दगडू पवार (रा. अक्कलकोट, सोलापूर) यांना अटक करण्यात आली आहे.