न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जून २०२२) :- महिलेला पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायास प्रवृत्त केले. तिच्याकडून व्यवसाय करवून घेत त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजीविका भागवली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक मोबाईल, रोकड व इतर साहित्य असा एकूण बारा हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई तळवडे येथे करण्यात आली. या प्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार राशिद हाफीज बेग (वय २३, रा. देहूगाव) याला अटक केली असून लॉज मालक वसंत शेट्टी (रा. चिखली), राणी काळे (रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) व इतर आरोपींवर गुन्हा दाखल आहे. देहूरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.