न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०२२) :- घरासमोर राहणाऱ्या आणि मजुरीचे काम करणाऱ्या एका महिलेला फिर्यादी महिलेने दोन ते दिवस झाले काम मिळत नसल्याचे सांगितले. त्या महिलेने फिर्यादीला आरोपीकडे काम आहे, तु जाते का कामाला असे विचारले. त्यावर फिर्यादी महिलेने कामाला जाण्याची तयारी दर्शविली.
आरोपीने महिलेला दुचाकीवर बसवून चिंचवडला नेले. फिर्यादीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. तसेच मी तुझ्यासोबत केलेले कोणाला काहीही सांगितले. तर, माझा मेहुणा डाकू आहे. लोकांना मारुन पैसे घेतो, तो तुला पण मारुन टाकीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना बुधवारी (दि. ८) दुपारी दोनच्या दरम्यान चिंचवडेनगर येथे घडली. महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रावण भीमराव मेहकरे (वय ५०, रा चक्रपाणी देवकर वस्ती, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे. चिंचवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.