न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०२२) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे जिल्हा दौऱ्यावर आले होते. पंतप्रधानांच्या दाै-या निमित्त संपुर्ण जिल्ह्यातील पाेलीस सतर्क झाले. पिंपरी चिंचवड शहरात पोलिसांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांची धरपकड केली.
पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्या दरम्यान मारुती भापकर यांनी कोणतही आंदोलन करु नये म्हणून त्यांना आज सकाळीच पिंपरी पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील दळवीनगर भागातील रेल्वेलाईन ग्रस्त लोकांच्या पुनर्वसन मागणीसाठी मारुती भापकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा दरम्यान आंदोलन करणार होते.
दरम्यान लोकशाहीत मला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. तरी पोलीस मला आंदोलन करू देत नसल्याने मारुती भापकर यांनी पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये लाक्षणिक आंदोलन सुरू केले आहे.