- यंदा निकालात काहीशी घट; तब्बल सव्वाशेच्या जवळपास शाळांची शंभरी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२२) :- मार्च २०२२ मध्ये झालेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. १७) दुपारी एक वाजता जाहीर झाला. पिंपरी चिंचवड शहराचा इयत्ता दहावीचा निकाल ९७.७३ टक्के लागला असून, निकालात २.१९ टक्क्यांनी घट झाली आहे. तर, महापालिकेच्या १८ माध्यमिक शाळांचा ९१.०९ टक्के निकाल लागला आहे. सर्वाधिक कमी रूपीनगर शाळेचा ७१.३० टक्के निकाल लागला आहे.
मुलांचा निकाल ९७.१७ टक्के तर मुलींचा निकाल ९८.३९ टक्के लागला आहे. पुर्नपरीक्षार्थ्यांचा ४९.५२ टक्के निकाल लागला आहे. तब्बल १२४ शाळांनी निकालाची शंभरी गाठली आहे.
शहरात दहावीच्या परीक्षेला १८८ शाळांमधून एकूण १९६७४ विद्यार्थी बसले होते. यामध्ये १०६१६ मुले व ८९७८ मुली परीक्षेस बसल्या होत्या. त्यातून १०३१६ मुले व ८८३४ मुली उत्तीर्ण झाल्या. एकूण १९१५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.