न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रु.) :- नवी सांगवीतील साई चौकामधील साई मंदिराचा १६ वा वर्धापनदिन शुक्रवार (दि. १५) रोजी संपन्न होणार आहे. या वर्धापनदिना निम्मित विविध कार्यक्रमांची रेलचेल असून, यावेळी साईंची काकड आरती, होमहवन व अभिषेक पूजा, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी साईंची महाआरती राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांच्या हस्ते सायं ७ वाजता होणार असून, या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती शिवसेना गटनेते व नगरसेवक राहुल कलाटे, मा. नगरसेवक प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, पोपट जम, सोनाली जम, सुषमा तनपुरे, कुमार ढोरे, विजय ढोरे, महेश भागवत, सुनील ढोरे, पंकज कांबळे, सतपाल ढोरे, योगेश गायकवाड आदींची असणार आहे.
सायंकाळी ६ वाजता ‘साई नवनाथ भजन संध्या’ सादरकर्ते बाळासाहेब परदेशी यांचा साई भक्तीगीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती आयोजक नगरसेवक नवनाथ जगताप व ओंम साई ट्रस्टच्या वतीने दिली आहे.











