न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रु.) :- केंद्र सरकारने स्मार्ट सिटी प्रकल्प हाती घेतला असून, देशातील १०० शहरांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत असून, त्यात राज्यातील दहा शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहराचाही समावेश आहे. स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी शहराचा तिस-या टप्प्यात समावेश झाला आहे. ही योजना राबविण्याकरिता पिंपरी महापालिकेकडून १३ जुलै २०१७ रोजी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड या विशेष उद्देश वहन कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.
स्मार्ट सिटीअंतर्गत झालेल्या कामावर रँक काढला जातो. त्यात शहराचा २६ वा क्रमांक आहे, अशी स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण यांनी माहिती दिली आहे.















