न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२२) :- पिंपळे गुरव बॅडमिंटन हॉल शेजारील मैदानावर मॅनेजमेंटचे काम पाहणा-यांना भेटण्यासाठी फिर्यादी हे गेले होते. दरम्यान, तेथे बसलेल्या आरोपीने फिर्यादीस इकडे या असा आवाज दिला.
त्यावेळी फिर्यादी यांचा मित्र यांनी आरोपीस तू इकडे ये, असा आवाज दिला. त्यांच्या बोलण्याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीसह त्यांच्या दोन मित्रांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून जखमी केले.
अक्षय गोकुळदास पांचाळ (रा. कृष्ण चौक, नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चेतन पाटील (रा. विद्यानगर, कृष्णा चौक, नवी सांगवी) व इतर तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.