- आरोपीची तरुणीकडे शारीरिक संबंधाची मागणी; आरोपी अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२२) :- तरुणीला आरोपीने लग्नाची मागणी घातली. मात्र, शिक्षण पूर्ण झाल्यावर आई-वडिलांना लग्नाबाबत विचारून सांगते, असे फिर्यादीने सांगितले. दरम्यान, आरोपीने फिर्यादीला फोन करून शारीरिक संबंधाची मागणी केली.
त्यावर ‘तुझ्या घरच्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करेन, तू माझ्याशी लग्न केले नाही तर मी आत्महत्या करेन’, अशी आरोपीने धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीच्या घरासमोर रिक्षा घेवून येत आरोपीने त्यांचा पाठलाग केला. ही घटना चिंचवड येथे घडली.
पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम मनोहर पवार (वय २३, रा. लखमापुरी, ता. शेवगाव, जि. नगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.