न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जून २०२२) :- देशाच्या संरक्षणासाठी प्राण गमावलेल्या जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, दिव्यांग सैनिक व त्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी व माजी सैनिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यासाठी सशस्रसेना ध्वजदिन निधी संकलित करण्याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा सैनिक कार्यालयाने महापालिकेला कळविले होते.
त्यानुसार १८ लाख रुपये संकलनाचे उद्धीष्ट दिले आहे. त्यानुसार महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जुलै महिन्याच्या मासिक वेतनातून काही रक्कम कपात केली जाणार आहे.
आयुक्त दोन हजार रुपये, वर्ग एकचे अधिकारी एक हजार रुपये, मुख्याध्यापकांसह वर्ग दोनचे अधिकारी पाचशे रुपये, शिक्षकांसह वर्ग तीनचे कर्मचारी दोनशे रुपये आणि सफाई कर्मचारी वगळून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून प्रत्येकी शंभर रुपये कपात केले जाणार आहेत.














