- उद्या बहुमत चाचणी होणार; मुख्यमंत्री थोड्याच वेळात जनतेशी संवाद साधणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जून २०२२) :- राज्यपालांच्या बहुमत चाचणीच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आहे. महाविकास आघाडी सरकारला कोर्टाने धक्का दिला आहे. शिवसेनेची सूचना कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे उद्या गुरुवारी सकाळी ११ वाजता बहुमत चाचणी होणार आहे.
मात्र, येत्या अकरा तारखेला १६ आमदारांच्या निलंबनाचा निर्णय त्यावेळी घेण्यात येणार असल्याचे कोर्टाने सांगितले आहे. दरम्यान रात्री साडेनऊ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेचे मंत्री आणि नेते अनिल परब राजभवनाकडे निघाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता जास्त आहे.














