न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२२) :- संगनमताने फिर्यादी यांना आरोपींनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर नफा देऊ असे अमिष दाखविले. त्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडून फिर्यादी यांच्याकडील ऑगस्ट २०२१ ते डिसेंबर २०२१ आणि आजतगायत ७१,२४,९३१ रुपये इतकी रक्कम एफएफआय चिटफंडमध्ये गुंतवण्यास भाग पाडले. त्यावर परतावा म्हणून एकूण १६,३५,०६९ रूपये स्वरक्कम व मूळ रक्कम असे मिळून एकूण ८७,६०,००० रुपये फिर्यादी यांना परत मिळणार होते.
परंतु, ही रक्कम एफएफआय चिट फंडचे डायरेक्टर आरोपी यांनी फिर्यादी यांचा विश्वासघात करून फिर्यादी व इतर ठेवीदारांचे पैसे स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापरून फिर्यादी ८७,५०,००० रुपयांची आर्थिक फसवणूक करून अपहार केला. नटराज कामत (वय ६० वर्षे, रा. उद्योमनगर, पिंपरी ) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मुक्ता उनवणे (वय ४२ वर्षे) यांना अटक करण्यात आली आहे. व्यंकट उनवणे (वय ४६ वर्षे) व मॅनेजर अपर्णा काळोखे (वय अंदाजे ३० वर्ष) (सर्व राहणार मोरवाडी, पिंपरी) हे आरोपी आहेत. पिंपरी पोलिस पुढील तपास करीत आहेत.


















