न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२२) :- शाळा सुटल्यानंतर मुलगा घरी निघाला होता. पुणे-नाशिक महामार्गाने जात असताना भारतमाता चौकात भरधाव डंपरने त्याला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
शंभो अर्जुन साठे (वय १३, रा. साई कॉलनी, दक्षिण लक्ष्मीनगर, मोशी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार आनंद गोविंद केंद्रे (वय ४४, रा. मु. पो. अबुलगा, ता. कंधार, जि. नांदेड) याला पोलिसांनी अटक केली आहे. शंभो हा मोशीतील नागेश्वर विद्यालयात नववी इयत्तेत शिकत होता. एमआयडीसी भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.















