न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२२) :- वर्षाविहारासाठी लोणावळा, खंडाळा परिसरात पुणे-मुंबईसह इतर भागातील मोठ्या संख्येने पर्यटक आज शनिवारी दाखल झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे.
शनिवारी आणि रविवारी सलग सुट्ट्या आल्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढते. वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांसह स्थानिकांना पाच ते दहा मिनिटांचे अंतर कापण्यासाठी अर्धा ते पाऊण तास वेळ लागतोय. मोटारींच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.
गर्दी वाढल्याने व्यवसाय वाढतो, असा स्थानिक दुकानदारांचा अनुभव आहे. मात्र, दुकानासमोर मोटार तसेच दुचाकी लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने दुकानात खरेदीसाठी फारशी गर्दी नसल्याचे दुकानदारांनी सांगितले.