न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा कुदळवाडी क्र. ८९ येथील मुख्याध्यापक सगभोर नानासाहेब भाऊसाहेब हे ३७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले.
त्यांचा कार्यपूर्ती सपत्निक सत्कार समारंभ शनिवार दिनांक २ जुलै रोजी शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला. त्याप्रसंगी मा. स्वीकृत सदस्य दिनेश यादव अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात मुख्याध्यापक सगभोर यांचे उत्तम प्रशासनाची जाण असणारे, कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक म्हणून गौरव केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल बगाटे यांनी व प्रास्ताविक सौ. सविता कावळे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रभारी मुख्याध्यापक संपत पोटघन आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी केले.