न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२२) :- पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला. पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देत शिवीगाळ केली. तसेच पत्नीसह मुलांना मारून टाकण्याची धमकी दिली.
हा प्रकार नवी सांगवी येथे घडला. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल झाला आहे. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.