- तीन महिलांची सुटका; तिघांना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२२) :- दुर्गानगर चौकातील मिलन लॉजिंग अँड बोर्डिंग या लॉजवर पोलिसांनी कारवाई करीत चार महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. लॉजचा मॅनेजर प्रदीप माधवा पुजारी (वय ३२, रा. निगडी), चालक मालक शशांक शेट्टी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप याला अटक केली असून त्याच्याकडून ६३ हजार ६७५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
थरमॅक्स चौक ते दुर्गा चौक दरम्यान साईदीप लॉजमध्ये दुसरी कारवाई करीत पोलिसांनी एका महिलेची सुटका करीत १४ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दीपेन दिनेश शेट्टी (वय ३०, रा. पुनावळे), विवेक नोबराज विश्वकर्मा (वय २५ रा. चिंचवड, मूळ रा. नेपाळ) या दोघांना अटक केली आहे. दोन्ही गुन्ह्याचा तपास निगडी पोलीस करीत आहेत. या दोन्ही कारवाया शुक्रवारी (दि. १) दुपारी करण्यात आल्या.















