न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जुलै २०२२) :- मामाने भाचीवर वेळोवेळी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मामा हा भाचीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असताना भाची ओरडली. त्यावेळी तिचा मावसभाऊ तिथे आला.
मामाने त्यालाही मारहाण केली. त्यानंतर आरोपी मामाने फिर्यादीच्या घरातील कपाटाच्या काचा फोडून नुकसान केले. ही घटना १७ ते २६ जून आणि १ जुलै रोजी पिंपरीमध्ये घडली. १४ वर्षीय मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार २९ वर्षीय मामाला पोलिसांनी अटक केली.















