न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रु.) :- पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी काल पुलवामा येथे केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना शिवसेनेच्या वतीने पिंपरी-चिंचवड व कामशेत येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या शनिवार (दि. १६) रोजी पिंपरी-चिंचवड शहरात तसेच संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघात विभाग प्रमुख व शिवसैनिकांनी ठिकठिकाणी आयोजित केलेले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच जाहिराती अथवा जाहिरात फलक लावू नयेत, असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांनी केले आहे.











