न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रु.) :- काश्मीरमधील पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थी आणि शिक्षकांकडून निषेध करण्यात आला आणि या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जखमी जवानांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, अशी सदिच्छा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका हर्षा बाठिया, गीता येरुणकर, तेजल कोळसे पाटील, मंगल आढाव, भटू शिंदे, शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.
शिक्षिका मंगल आढाव म्हणाल्या, की ही घटना दुर्दैवी आहे. यात आपले बांधव शहीद झाले आहेत. देशविघातक शक्तींना भारताने सडेतोड उत्तर दिलेच पाहिजे. भारताने आपली ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे.











