न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रु.) :- जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) एका तुकडीवर दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात ३९ जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांनी आयईडी स्फोट केला. यात सीआरपीएफचे अनेक जवान जखमी झाले आहेत. या वर्षातला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, माजी महापौर, नगरसेविका अपर्णा डोके, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, माजी नगरसेविका शमीम पठाण, सिंधू पांढारकर, प्रवक्ते फजल शेख, नगरसेवक मयुर कलाटे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विद्यार्थी सुनिल गव्हाणे, सेवादल अध्यक्ष आनंदा यादव,
पिंपरी विधानसभा अध्यक्ष निलेश पांढारकर, महिला संघटक कविता खराडे, महिला कार्याध्यक्ष पुष्पा शेळके, भोसरी विधानसभा महिला अध्यक्षा मनिषा गटकळ, दिपाली देशमुख, बाळासाहेब पिल्लेवार, आशा शिंदे, जहिर खान, गोरोबा गुजर, बाळासाहेब जगताप, सचिन मोरे, शिल्पा बिडकर, प्रियांका सुतार, साउल शेख, शेखर काटे, योगेश गवळी, सनी डहाळे, पवन जवळकर, विशाल पवार, प्रतिक साळुंके, सुनिल अडागळे, अर्जुन कदम आदी उपस्थित होते.











