न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रु.) :- जम्मू आणि काश्मीर मधील पुलवामा जिल्हयात दहशतवाद्यानी केलेल्या हल्ल्यात ४२ जवान शहीद झाले. याचा चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये शुक्रवार (दि. १५) रोजी शोक प्रकट करण्यात आला.
यावेळी संस्थापक संदीप काटे, मुख्याध्यापिका सुषमा उपाध्ये, तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर वर्गांनी सर्व शहीद जवानांना शाळेच्या वतीने २ मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहिली.











