न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. १६ फेब्रु.) :- सामाजिक कार्यकर्ते हनुमंत गायकवाड यांनी प्रसिद्धीस पत्र दिले असून, त्यात म्हटले आहे की, मोशी प्राधिकरण, संतनगर सेक्टर नं. ६ येथील जलवायू विहार शेजारील प्लॉट नंबर ३० ते ७५ या बंगलो प्लॉटचे पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने एकत्रीकरण करण्यात येणार आहे.
त्याठिकाणी प्राधिकरणामार्फत “घरकुल” सारखी स्कीम होणार आहे. हे भविष्यकाळात परीसराच्या वैभवावर दुष्परीणाम करणारे ठरु शकते. सेक्टर ५, ८, ११, १२, १४, चिखली, मोशी गायरान येथे शेकडो एकर जागा शिल्लक असतानासुध्दा सेक्टर ४, ६, ९ या उच्चभ्रू लोकजीवनावर दुरगामी वाईट परीणाम करणारा हा गृहप्रकल्प येथे नकोच, इतरत्र करा. अशी ठाम भुमिका मोशी प्रधिकरण संतनगर सेक्टर ४, ६, ९ मधील तमाम मुळ रहिवाशी नागरीकांची आहे.
परीसरात आवश्यक गार्डन व इतर प्रकल्पास जागा उपलब्ध नाही, अशा परीस्थितीत येथे सुरु होणाऱ्या नियोजित “घरकुल” प्रकल्पास सामुहिक विरोध करायलाच हवा, असे आवाहन हनुमंत लांडगे यांनी या पत्रात केले आहे.











