- शत्रुघ्न काटे फाउंडेशनच्यावतीने मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १६ फेब्रु.) :- काश्मीरमधील पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा येथील नगरसेवक शत्रुघ्न काटे फाउंडेशनच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच यामध्ये शहीद झालेल्या जवानांना मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी आदरांजली वाहताना नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले, काश्मीरमधील पुलवामा दहशतवादयांच्या भ्याड हल्यात शहिद झालेल्या या विरपुत्रांची कमी, तर भरुन काढू शकत नाही. परंतु, या मेणबत्तीच्या रूपात त्यांचे हे बलिदान सदैव देशवासियांच्या मनात उजागर ठेऊ. जे आपल्या या येणाऱ्या पिढीतले देशप्रेम कधी विझू देणार नाही. तसेच यापुढे दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी असेच आपण या शहीद विरपुत्रांना नमन करण्यासाठी जमणार आहोत, अशा शब्दात नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आदरांजली वाहिली.
यावेळी नगरसेविका निर्मला ताई कुटे, पवना सहकारी बँकेचे व्हा. चेअरमन जयनाथ काटे, चंदा भिसे, झोपे, वाणी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











