- पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत मालकांना नोटीसा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०२२) :- पिंपरी – चिंचवड शहरात १४१ धोकादायक इमारती इमारती असून, धोकादायक इमारतींची सर्वाधिक ६९ संख्या ह क्षेत्रीय कार्यालय हद्दीत आहे. त्या सर्व इमारतींना क्षेत्रीय कार्यालयामार्फत नोटीसा देण्यात आल्या आहेत.
पावसाळ्यात धोकादायक इमारत कोसळून जीवितहानी किंवा वित्तहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे महापालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक इमारत, जुने वाडे यांचे सर्वेक्षण करण्यात येते. इमारत, वाडा मालकांना नोटीसा देण्यात येतात. धोकादायक इमारतींची संख्या शहरात १४१ आहे. त्यातील ७० इमारती या अतिधोकादायक आहेत. सर्वाधिक ६९ धोकादायक इमारती या ‘ ह ‘ क्षेत्रीय कार्यालयाच्या दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, सांगवी या परिसरातील आहेत.
त्यापैकी ६७ इमारतींची दुरुस्ती करून घेण्यात आली आहे. उर्वरित दोन इमारत मालकांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. नोटीस दिल्यानंतर त्यातील १८ इमारती रिकाम्या करून त्याची दुरुस्ती करून घेण्यात आली आहे. तर, इमारती रिकाम्या न करता इमारतींची दुरुस्ती केली गेली. ३५ इमारतींची किरकोळ दुरुस्ती केली आहे. अद्याप ४४ इमारतींच्या मालकांनी पालिकेच्या नोटीशीला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.
शहरातील धोकादायक इमारतींचा शोध घेऊन त्यांना महापालिकेने नोटीस दिली आहे. नोटीसला प्रतिसाद देत बहुतांश नागरिकांनी स्वतःहून दुरूस्ती करून घेतली आहे. ज्यांनी प्रतिसाद दिला नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
– मकरंद निकम, शहर अभियंता पिंपरी – चिंचवड महापालिका…